बाळाची ₹ 4 लाखाला विक्री @कर्नाटक

बाळाची ₹ 4 लाखाला विक्री @कर्नाटक

global belgavkar

डॉक्टरसह 7 जणांना अटक, बनावट दाखले जप्त

कर्नाटक : बनावट कागदपत्रे तयार करून बालकाची 4 लाख रुपयांना विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत जिल्हा बाल संरक्षण शाखा व महिला ठाण्याच्या पोलिसांनी डॉक्टरसह 6 आरोपींना अटक केली. दावणगेरे येथील एम. के. मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉ. भारती, बालकाची आई काव्या, बालक विकत घेणारे दांपत्य जया आणि प्रशांतकुमार तसेच मध्यस्थ वादीराज आणि मंजम्मा यांना अटक करण्यात आली.
प्राथमिक तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अडीच महिन्यांच्या बालकाला बाल संगोपन केंद्रात आश्रय देण्यात आला आहे. चाईल्ड हेल्पलाईनवर कॉल करून निनावी व्यक्तीने माहिती दिली की, काव्याच्या एका बालकाची जया आणि प्रशांतकुमार कुरुडेकर यांना एम. के. मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. भारती यांनी मध्यस्थ वादीराज आणि मंजम्मा यांच्यामार्फत विक्री केली आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा बाल संरक्षण शाखेच्या टी. एन. कविता आणि त्यांच्या पथकाने विनोबानगर येथील जया आणि प्रशांतकुमार यांच्या घरी जाऊन तपासणी केली. यावेळी जन्म दाखल्यासह अनेक बनावट दाखले जप्त करण्यात आले.
जया आणि प्रशांतने 26 ऑगस्ट रोजी बालकाचा जन्म झाल्याचे कागदपत्र तयार केल्याचे आढळून आले. कागदपत्रांच्या आधारे पथकाने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता बालकाच्या विक्रीच्या प्रकरणाची पुष्टी झाली. पतीपासून घटस्फोट घेतलेल्या काव्याने काही महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिला. नंतर तिने मुलाला विकण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या सात वर्षांनंतरही जया आणि प्रशांत यांना मूलबाळ झाले नाही. काव्याने डॉक्टर, मध्यस्थ वादीराज यांच्यामार्फत चार लाख रुपयांना बालक विकले.

आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक उमा प्रशांत यांनी दिली. चौकशीत मुलाची आई काव्याने सांगितले की, तिला सांभाळणे शक्य नसल्याने तिने मुलाला विकले.

Police arrested six people including a gynaecologist in connection sale of child

Doctor and five others arrested in sale of child

बाळाची ₹ 4 लाखाला विक्री @कर्नाटक
डॉक्टरसह 7 जणांना अटक, बनावट दाखले जप्त

Support global belgavkar | Help us continue running the globalbelgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918073540138 (global belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm