नामवंत इन्शुरन्स कंपनीच्या 3 कोटींहून अधिक ग्राहकांचा डेटा लीक

नामवंत इन्शुरन्स कंपनीच्या 3 कोटींहून अधिक ग्राहकांचा डेटा लीक

global belgavkar

Star Health Insurance data leak : $68,000 ransom demand email to MD & CEO. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Star Health Insurance data breach

star-health-insurance-stock-falls-after-massive-data-breach-star-health-insurance-data-leak-202410_1.jpeg | नामवंत इन्शुरन्स कंपनीच्या 3 कोटींहून अधिक ग्राहकांचा डेटा लीक | global belgavkar
Data of 31 million Star Health Insurance customers allegedly sold by company's CISO : भारतातील अग्रगण्य आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या 3.1 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक डेटा मोठ्या प्रमाणावर लीक झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मोठ्या सायबर हल्ल्यामुळे ग्राहकांचे नावे, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ते, पॉलिसी तपशील, जन्मतारीख आणि गोपनीय वैद्यकीय नोंदी यांसारखा संवेदनशील डेटा उघड झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा डेटा ऑनलाइन विक्रीसाठी देखील उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.
स्टार हेल्थ इन्शुरन्सने या सायबर हल्ल्याची कबुली दिली असून कंपनीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरने जवळपास 7.24 टेराबाईट्स इतका प्रचंड डेटा चोरून त्याची किंमत 1.50 लाख अमेरिकन डॉलर्स इतकी लावली आहे. इतकेच नव्हे, तर 1 लाख ग्राहकांचा डेटा 10 हजार डॉलर्सला विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या गंभीर प्रकरणात आणखी एक मोठा आरोप समोर आला आहे की, कंपनीच्या मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सीआयएसओ) अमरजीत खनुजा यांनीच हा डेटा हॅक करण्यास मदत केली.
Star Health Insurance stock falls 2.5% after massive data breach
हा आरोप एका व्हिसलब्लोअरने केला असून, खनुजाने Tox नावाच्या एन्क्रिप्टेड अ‍ॅपद्वारे हॅकरशी संपर्क साधला आणि क्रिप्टोकरन्सीच्या बदल्यात लॉगिन क्रेडेन्शियल्ससह एपीआय तपशील पुरवले असल्याचा आरोप आहे. कंपनीने मात्र या सर्व आरोपांचे खंडन केले आहे आणि हा हल्ला जाणूनबुजून केलेला एक घातपात आहे असे म्हटले आहे. कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार, ग्राहकांच्या डेटाची सुरक्षितता महत्त्वाची असून, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी सायबर सुरक्षा तज्ञांची मदत घेतली जात आहे. ग्राहकांना आश्वासन देण्यात आले आहे की, कंपनीच्या सेवा सुरळीत सुरू आहेत.
स्टार हेल्थ इन्शुरन्सने या हल्ल्याच्या चौकशीसाठी फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर कंपनीने हॅकरविरोधात आणि टेलिग्रामवर ज्या माध्यमातून हा डेटा शेअर झाल्याचा आरोप आहे, त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनी सरकारी आणि नियामक यंत्रणांशी समन्वय साधून या हल्ल्याचे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Star Health Insurance stock falls after massive data breach

Star Health Insurance data leak : 68 000 ransom demand email to MD CEO What happened?

Data of 31 million Star Health Insurance customers allegedly sold by companys CISO

Star Health Insurance data breach :

Star Health receives 68 000 ransom demand from cyberhacker after data leak

नामवंत इन्शुरन्स कंपनीच्या 3 कोटींहून अधिक ग्राहकांचा डेटा लीक
Star Health Insurance data leak : $68,000 ransom demand email to MD & CEO. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Support global belgavkar | Help us continue running the globalbelgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918073540138 (global belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm