₹ 5000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

₹ 5000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

global belgavkar

ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

cocaine worth Rs 5000 crore seized in Gujarat

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज सापडल्याची प्रकरणं समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्यात गुजरात एटीएस आणि इतर केंद्रीय यंत्रणांनी संयुक्त कारवाईत 3300 किलो ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर या कारवाईत 3089 किलो चरस, 158 किलो मेथॅम्फेटामाइन आणि 25 किलो मॉर्फिन जप्त करण्यात आल्याचे नौदलाने म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे मोठे ऑपरेशन पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले होते. फेब्रुवारीनंतरही पकडलेल्या पाकिस्तानी नागरिकांकडून 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. एप्रिलमध्येही गुजरात किनारपट्टीवर 86 किलो 602 कोटी रुपये ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले आहेत.
दिल्लीतील महिपालपूरमध्ये पकडलेल्या सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या कोकेन तस्करी सिंडिकेटची व्याप्ती वाढत आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दिल्ली पोलिस आणि गुजरात पोलिसांनी संयुक्त कारवाईत गुजरातमधील अंकलेश्वर येथून 518 किलो कोकेन जप्त केले आहे. बाजारात त्याची किंमत 5000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पंधरा दिवसातील ड्रग्ज जप्तीची ही तिसरी मोठी घटना आहे. याआधी पोलिसांनी 1 ऑक्टोबरला महिपालपूर येथून 562 किलो कोकेन आणि गेल्या आठवड्यात दिल्लीतील रमेश नगर येथील याच सिंडिकेटच्या लपून बसलेले 208 किलो कोकेन जप्त केले होते.
गुजरातमध्ये ड्रग्जच्या आणखी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. रविवारी दिल्ली पोलिस आणि गुजरात पोलिसांनी अंकलेश्वरमधील एका औषध कंपनीमध्ये शोध मोहीम राबवली होती. या शोध मोहिमेदरम्यान 518 किलो कोकेन जप्त करण्यात आले. या कोकेनची किंमत 5000 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही दिल्ली पोलिस आणि गुजरात पोलिसांच्या पथकांनी अमली पदार्थांची मोठी खेप जप्त केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अधिक तपास केला असता, जप्त केलेले ड्रग्ज  फार्मा सोल्युशन सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे असून ते गुजरातमधील अंकलेश्वर येथील अवकार ड्रग्स लिमिटेड कंपनीत सापडलं. त्यानंतर पुढील कारवाई सुरू करण्यात आली. गुजरातमध्ये यापूर्वी सुरतमध्ये ड्रग्जचा कारखाना सापडला होता. याशिवाय कच्छमधील मुंद्रा बंदरातही अनेक वेळा ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.  दरम्यान, दिल्ली ड्रग्ज प्रकरणात पकडलेल्या आरोपींचे दुबई आणि ब्रिटनमधून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. दक्षिण दिल्लीतील महिपालपूर येथील एका गोदामातून 5620 कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती तर आणखी दोघांना नंतर अमृतसर आणि चेन्नई येथून पकडण्यात आले होते.

Large quantities of drugs found again in Gujarat; Cocaine worth Rs 5000 crore seized

Cocaine worth ₹5000 crore seized in Gujarats Ankleshwar third seizure in past

Another major drug bust : Delhi and Gujarat police seize 518 kg of cocaine worth Rs 5000 crore in joint op

Another massive drug bust cocaine worth Rs 5000 crore seized in Gujarat

₹ 5000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त
ड्रग्जच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Support global belgavkar | Help us continue running the globalbelgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918073540138 (global belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm