कर्नाटक : आमदारांची सीडी...! Yatnal to undertake anti-waqf campaign

कर्नाटक : आमदारांची सीडी...!
Yatnal to undertake anti-waqf campaign

global belgavkar

बोर्डाविषयी बोलल्यानंतर कादरीची धमकी

Waqf row : Muslim leaders from Vijayapura threaten to 'expose' BJP leader

कर्नाटक—belgavkar : वक्फ बोर्डाविषयी बोलल्यानंतर कादरीने आपल्याविरुद्ध सीडी जाहीर करण्याची धमकी दिली होती. त्यांनी सीडी प्रसिद्ध करुनच दाखवावी, असे आव्हान भाजपचे ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केले आहे.
कादरीने वक्फ बोर्डाची मालमत्ता लुटली आहे. जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका संशयिताने वक्फ बोर्डाची मालमत्ता लुटली होती. त्याच्याविरुद्ध आंदोलन छेडले होते. त्यावेळी कादरीने सीडी जाहीर करण्याचे धमकावले होते, याची दखल आता घेतल्याचे यत्नाळ यांनी म्हटले आहे. एका लुटखोराने केलेल्या विधानाला काही सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली आहे. सीडी उघड करायची असेल तर बोललेल्या क्षणीच करावी. विनाकारण बरळणाऱ्यांकडे लक्ष देण्यास आपल्याकडे वेळ नाही. त्याच्या विधानाकडे गांभीर्याने पाहू नये, असे आवाहन यत्नाळ यांनी केले आहे. त्याच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा आणि फौजदारी खटला दाखल करणार असल्याची माहिती आ. यत्नाळ यांनी दिली

Karnataka Waqf row : Muslim leaders from Vijayapura threaten to expose BJP leader

Yatnal to undertake anti waqf campaign

Karnataka

कर्नाटक : आमदारांची सीडी...! Yatnal to undertake anti-waqf campaign
बोर्डाविषयी बोलल्यानंतर कादरीची धमकी

Support global belgavkar | Help us continue running the globalbelgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918073540138 (global belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm